ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये ‘वन हक्क कायदा २००६’ अंमलबजावणीच्या बाबतीत यशस्वी ठरलाय. त्यासाठी विविध राजकीय, सामाजिक व बिगरशासकीय संघटनांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिलेला आहे!

संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतर दुर्लक्षित घटकांसाठी शासनाची जबाबदारी क्रमप्राप्त झाली. त्यातून अनेक पुरोगामी कायद्यांची निर्मिती झाली, परंतु अनेक कायदे अंमलबजावणीअभावी निष्प्रभ ठरले. परंतु ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये वन हक्क कायदा २००६ अंमलबजावणीच्या बाबतीत यशस्वी ठरला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विविध राजकीय संघटना, सामाजिक संस्था व बिगरशासकीय संघटना यांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिलेला आहे.......